जात हो सांस्कृतिक बाजारपेठ आहे का? जात मागास व्यवस्था आहे का? जात फक्त आरक्षण आणि गुणवत्तेपुरतीच मर्यादित आहे का? एकविसाव्या शतकात भारतात जातीचं अस्तित्व आहे.
या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेला पहिल्या पिढीचा दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतो. दलित वस्तीत वाढत असताना आलेले अनेक कटू अनुभव त्यानं सांगितले आहेत. दररोज नरकयातना भोगाव्या लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरी याचंही चित्रण तो करतो. दलितांसाठी राजकारण, प्रशासन, न्यायव्यवस्था एक बळकट काचेचं द्वार आहे, त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न तो करतो. एंगडेनं या पुस्तकात धाडसी आणि प्रामाणिक कथन केलं आहे. दलित समाजातील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात.
जात ही मानवी सर्जनाचा नाश कसा करते आणि वर्गीय शोषण, वांशिक विषमता, लैंगिक विषमता या शोषणाच्या इतर स्वरूपांशी तिचं साधर्म्य कसं आहे हे उलगडण्याचा प्रयत्न चाकोरी मोडणारं हे पुस्तक करतं. विषमतामूलक व्यवस्थेची चिकित्सा आणि त्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहनही हे पुस्तक करतं. जोवर दलित सत्तेवर आपला अधिकार सांगणार नाहीत आणि ब्राह्मणवादाविरोधातल्या या लढाईत ब्राह्मण स्वतः सहभागी होऊन खराखुरा बदल घडवून आणणार नाहीत, तोवर जात हा कळीचा मुद्दा राहणार आहे असं या पुस्तकाचं आग्रही प्रतिपादन आहे
(मलपृष्ठावरून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कास्ट मॅटर्स