कॉलेजला असताना मी पारंपरिक रूढ अर्थाने धार्मिक होतो. आमच्या घरात तेव्हा `कृष्णमूर्तीचे जीवनभाष्य` हे पुस्तक कुठून तरी आले होते. ते पुस्तक एक दिवस सहज हाताला लागले. त्यात एका प्रकरणात एक साधू कृष्णमूर्तीना भेटायला आलेला - ईश्वराच्या शोधात सर्व साधना करून निराश झालेला. कृष्णमूर्ती सर्व साधना आणि शोध यांच्या मर्यादा शांतपणे त्याला सांगताहेत. मी तर हादरलोच! कारण मला तो साधू माझा प्रतिनिधी वाटायला लागला. कृष्णजींच्या बिनतोड युक्तिवादाने आपला जगण्याचा पायाच कुणीतरी काढून घेतंय असंच वाटायला लागलं. त्या पुस्तकाची भीती वाटायला लागली. अधूनमधून वाचायचो आणि पुन्हा फेकून द्यायचो. शेवटी दारावर रद्दीवाला आला आणि मी ते पुस्तक देऊन टाकले. मी सुटलो. पण या माणसाचे भूत काही माझी पाठ सोडेना.पुढे शिक्षण झालं. मी शिक्षक झालो. चांगला शिक्षक म्हणजे मुलं आपल्याला घाबरली पाहिजेत अशी समजूत. त्यातून अधिकच कठोर वागू लागलो. पोरांना इंग्रजी येईना तेव्हा अधिकच मारकुटा झालो. शेवटी माझीच मला लाज वाटली. मुलांची भांडणं, प्रेमप्रकरणं, अभ्यास न करणं, लक्ष न देणं, एकाग्रता नसणं, वर्गात आपलं हिंसक होणं या सर्वांना वरवरची उत्तरं नाहीत हेही लक्षात येत गेलं व पुन्हा वळण घेऊन कृष्णमूर्तीजवळ येऊन थांबलो. दरम्यान सामाजिक कामाच्या मर्यादा लक्षात येऊन हे काम महत्त्वाचं आहेच पण केवळ व्यवस्थेचा आकार बदलून प्रश्न सुटणार नाहीत तर माणसाचं मन बदलणंही तितकचं महत्त्वाचं आहे हेही लक्षात आलं. अध्यात्मातल्या माझ्या शोधातही बराच जमिनीवर आलो होतो. तेव्हा कृष्णमूर्ती खूप जवळचे वाटू लागले. शिक्षणक्षेत्रात गुणवत्तेच्या आधारे शाळांची तपासणी केली. त्यात निराशा आली. त्याच वेळी कृष्णमूर्ती शाळा बघितल्या. तिथली समर्पणशीलता बघितली आणि आपल्या सरकारी शाळांतले प्रयोगशील..
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स