दलित व आंबेडकरवादी विचारवंतांची चरित्रे, आत्मकथने इत्यादी अनेकार्थाने गाजलीत. त्यांच्या आयुष्याचा चित्रपट अस्वस्थ करणारा होता. दुःख, दारिद्र्य, वेदना, यातना, भुक, तहान, कष्ट, उपासमार, रोगराई, अवकालीन मरण यांवर मात करून पुढे आलेले हे दलित-आंबेडकरवादी विचारवंत खऱ्या अर्थाने ग्रेट होते. बाबासाहेब आंबेडकरांना आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा होती, परंतु त्यांना कार्यबाहूल्यांमुळे ते लिहीता आले नाही. मात्र त्यांचा संघर्षमय जीवनपट त्यांच्या अनुयायांसाठी आदर्श ठरला. मी मध्यंतरी Learning to Live या शिर्षकाखाली इंग्रजी भाषेत माझ्या आयुष्याची काही प्रकरणे लिहीलीत. त्यांचा काही भाग ख्यातनाम प्रकाशकांकडे पाठविला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. अर्थात, मी काही गाजलेला नेता, सिनेनट, क्रिकेटपटू किंवा फुलनदेवीसारखा वलयांकीत व्यक्ती नाही, तरीही मी आयुष्याची वाटचाल करीत इथपर्यंत आलो तो खाचखळग्यांनी भरलेला रस्ता वाचकांना आकर्षित करेल व व्यावसायिक प्रकाशकाला त्यातून काही धनलाभ होईल या भाबड्या आशेने ती प्रकरणे लिहून त्या प्रकाशकांकडे पाठविलीत, पण आत्मचरित्र (किंवा नुसतं शब्दांकन) लिहून ते इंग्रजीत बड्या प्रकाशकाकडून प्रसिद्ध करण्यासाठी लेखकाला आधी सेलिब्रिटी व्हावं लागते याचा प्रत्यय आला. माझं इंग्रजी भाषेतील आत्मचरित्र प्रकाशित करायला कुणीही तयार झाले नाही.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आत्मशोध एक स्वकथन